अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण’बार्टी’ आणि ‘एमसीईडी’चा संयुक्त उपक्रम

Spread the love

अमरावती – : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा रोजगार सुरू करता यावा, या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

     या उपक्रमांतर्गत किमान दहावी पास उमेदवारांसाठी 1 महिना कालावधीचा डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी 2 महिने कालावधीचा अप्लाईड आर्टीफिशिअल इंटेलिजेंस विथ एम्फासिक ऑन रोबोटीक्स आणि आयओटी हे दोन कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात अभियांत्रिकी, एसीए, बीसीए आणि बीएससी पदवीधर यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

       प्रशिक्षणात उद्योजकीय कौशल्याचे प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. यात उद्योग उभारणी, शासकीय कर्ज योजना आणि अनुदानाची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, विक्री कला आणि उद्योग व्यवस्थापन, तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रत्यक्ष भेटी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी वय 18 ते 45 वर्षे, उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, राज्याचा गेल्या 15 वर्षांपासूनचा रहिवासी असावा लागणार आहे. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

       प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि रहिवासी दाखला जोडणे अनिवार्य आहे. याबाबत अधिक माहितीसाठी गणेश बहाड, ९४०५४३५७३१ यांच्याशी 1 महिन्याच्या कोर्ससाठी, तर 2 महिन्यांच्या कोर्ससाठी स्वप्नील इसळ, ८७८८६०४२२६, राजेश सुने ९१६८६६७१५४ यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुक उमेदवारांनी mced.co.in/Barti यावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीच्या प्रकल्प अधिकारी अनिता गवई आणि एमसीईडीचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे.

  • Related Posts

    रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. ०१ पाडोळी (आ.) येथे मिल रोलर पूजन उत्साहात; गाळप क्षमता २८०० टनांपर्यंत वाढ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी ) – रुपामाता नॅचरल शुगर यु. क्र. ०१, पाडोळी (आ.), ता. जि. धाराशिव येथे गाळप हंगाम २०२६–२७ निमित्त आयोजित मिल रोलर पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात…

    धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त  तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *