सोलापुरात धक्कादायक घटना : नामांकित बेकरी उद्योजकाची आत्महत्या

Spread the love

सोलापूर (प्रतिनिधी) : विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्थानिक उद्योजकाने 17 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

सुनील सदारंगांनी (वय ५९) असे मृत उद्योजकाचे नाव आहे. ते पनाश अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. गुरुवारी दुपारी त्यांनी हात जोडून आपल्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.

विजापूर नाका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सदारंगांनी हे होटगी रोडवरील ‘मुलतानी बेकरी’चे मालक होते. ‘मुलतानी ब्रेड’ हा ब्रँड एकेकाळी शहरात लोकप्रिय होता. मात्र काही वर्षांपूर्वी बेकरी बंद पडल्याने त्यांच्यावर आर्थिक व वैयक्तिक ताण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली असल्याची माहिती जवळच्या व्यक्तींनी दिली.
या घटनेमुळे व्यापारी व व्यावसायिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    बीएलओचे काम पाहणारे शिक्षक इंगळे यांचा अपघाती मृत्यू

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या बीएलओचे कर्तव्य पार पाडणारे गोविंद इंगळे रा‌.कनगरा ता. धाराशिव (वय – ५० वर्षे)…

    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३० तासांची झुंज यशस्वी,तेरणा नदीत बुडालेल्या अमरचा मृतदेह अखेर सापडला; तेर गावावर शोककळा..

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी…. धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *