जि.प व पं.स सार्वत्रिक निवडणूक राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न

Spread the love

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने १९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कक्षात राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.महादेव वाघमारे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे सतीश मातने,बसपाचे तुकाराम गवळी,राजपाल देशमुख,आकाश चौधरी दादा पाटील, एमसीएमसी नोडल अधिकारी विवेक खडसे,तहसीलदार (सामान्य),प्रकाश व्हटकर व नायब तहसीलदार सचिन पाटील यांची उपस्थिती होती.

श्री.कडवकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक कार्यक्रमाची सर्वसाधारण माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील व कार्यक्रमाचा दिनांक,निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी,निवडणूक काळात काय करावे व काय करू नये,विविध कक्ष व त्यांचे नोडल अधिकारी,सुरक्षा कक्ष व मतमोजणीचे ठिकाण,प्रचारासाठी सर्वसाधारणपणे लागणारे विविध परवाने,विविध परवाने सुलभरित्या प्राप्त होण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती श्री.कडवकर यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली.

  • Related Posts

    विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत…

    विधानपरिषदेत नव्या चेहऱ्यांची एंट्री; १४ मे रोजी दहा सदस्यांचा शपथविधी सोहळा

    Spread the love

    Spread the loveमुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांसह पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एका सदस्याचा शपथविधी समारंभ गुरुवार, १४ मे २०२६ रोजी सकाळी ११…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *