राज्य क्रीडा दिनानिमित्त ,जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धां उत्साहात संपन्न

Spread the love

धाराशिव – : राज्य क्रीडा दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव तसेच विविध क्रीडा संघटना व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात स्केटींग,मैदानी खेळ,कुस्ती, तायक्वांदो,खो-खो,बुद्धीबळ, नेटबॉल,डॉजबॉल,बॅडमिंटन आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रीडा दिनानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,रुईभर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ऑलिम्पिक पदक विजेते कै.खाशाबा जाधव व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. जयप्रकाश कोळगे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून श्री.राजकुमार सोमवंशी,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी तथा महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे खजिनदार, तसेच श्री.बी.के.नाईकवाडी,तालुका क्रीडा अधिकारी आणि क्रीडा मार्गदर्शक श्री.विश्वास खंदारे हे उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य श्री.जयप्रकाश कोळगे यांनी सांगितले की,अत्यल्प सुविधा असतानाही खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून देशाचा नावलौकिक वाढविला.सुविधा नसतानाही त्यांनी देशासाठी कठोर परिश्रम घेतले.त्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाचे महत्त्व ओळखले होते. कोणतेही कार्य परिश्रमानेच पूर्ण होऊन यश मिळते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक आपले ध्येय साध्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.बी.के. नाईकवाडी,तालुका क्रीडा अधिकारी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की,जिंकण्याची जिद्द आणि हारण्याची भीती मनात नसलेला व्यक्तीच खरा खेळाडू असतो. खेळामध्ये सातत्य व नियमित सराव अत्यंत महत्त्वाचा असून त्यातूनच यश मिळते.सर्वांनी मैदानी खेळ खेळल्यास शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते.खेळातील नियमावली अंगीकारल्यास जीवनातही शिस्त निर्माण होऊन चांगली कार्यसिद्धी साधता येते.याप्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी श्री. राजकुमार सोमवंशी यांच्या शुभहस्ते डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास प्राचार्य जयप्रकाश कोळगे,प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके,श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे,इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार,पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश शेटे यांनी केले,आभार श्री.सचिन कांबळे यांनी मानले.

  • Related Posts

    कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश…

    मिशन लक्ष्यवेध अंतर्गत लातूर विभागात ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र२० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी अॅथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *