खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी 65 कंत्राटदारांवर कारवाई सुरु

Spread the love

वर्धा – : बांधकाम कामगारांना 65 ठेकेदार व कंत्राटदारांनी 90 दिवसांचे बोगस खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द धडक कार्यवाही सुरु केली आहे.
त्यातील काही कंत्राटदारांनी आमच्या सही व शिक्क्याचा गैरवापर केला असल्याचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास लेखी निवेदन दिले असल्यामुळे कार्यालयाच्यावतीने कंत्राटरांचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. उर्वरीत काही ठेकेदारांवरी कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील दलाल, एजंन्ट, कंत्राटदार व काही संघटना यांचे धाबे दणाणले आहे. तसेच कंत्राटदाराने ज्या कामगारांना प्रमाणाबाहेर नियमबाह्य पध्दतीने 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्या कंत्राटदारांवर सुध्दा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत, नगरपरिषदतर्फे निर्गमित करण्यात आलेल्या 90 दिवस प्रमाणपत्रात अधिनियम कलम 1(4) अन्वये कंत्राटदाराकडे 10 पेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांनी सदर अधिनियम 7 (1) नियम 22 (1) अन्वये आस्थापनेची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच काही 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर पोलिस अधिक्षक यांच्यामार्फत देखील कार्यवाही सुरु आहे, असे सरकारी कामगार नोंदणी अधिकारी सचिन अरबट व रीना पोराटे यांनी कळविले आहे.

  • Related Posts

    कृषी निविष्ठा घोटाळ्याची चौकशी अपूर्ण? ‘तुळजापूरच्या मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई, मग इतर तालुक्यांचे काय?’; शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचा सवाल

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : जिल्ह्यात गाजत असलेल्या जवळपास २२ कोटी रुपयांच्या कथित कृषी निविष्ठा घोटाळ्याच्या चौकशीला आणि दोषींवर झालेल्या कारवाईला आता नव्या प्रश्नांची किनार लागली आहे. या प्रकरणातील कारवाई अद्याप…

    धाराशिव कृषी विभागातील ‘बडा मासा’ अजूनही मोकाट!

    Spread the love

    Spread the love१५ अधिकारी निलंबित; मात्र मुख्य सूत्रधारावर कारवाई कधी? “कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही; लवकरच कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेणार” — शेतकरी पुत्र मनोज जाधव धाराशिव : धाराशिव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *