इस्राईल देशात रोजगारासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

Spread the love

सांगली – : इस्राईल येथे रिनोवेशन कन्स्ट्रक्शन (“Renovation Construction) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध असून, अधिक माहिती व नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रिनोवेशन कन्स्ट्रक्शन (Renovation Construction) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इस्राईल देशात प्लास्टरिंग वर्क (Plastering Work) (१००० जागा), सिरॅमिक टायलिंग (Ceramic Tiling) (१००० जागा), ड्रायवॉल वर्कर (Drywall Worker) (३०० जागा) व मेसॉन (Mason) (३०० जागा) या पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्याकरिता इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान (वाचन, लेखन व संवादकौशल्य), १० वी पास तसेच, वय वर्षे २५ ते ५० वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    धाराशिव येथे २२ मे रोजी भव्य रोजगार मेळावा ; १७ नामांकित आस्थापनांकडून २८९ पदांसाठी भरती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व महिला उमेदवारांसाठी शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता…

    अधिकारमित्र’ पदासाठी अर्जास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Spread the love

    Spread the loveनिस्वार्थ समाजसेवेची इच्छुकांसाठी सुवर्णसंधी — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत ‘अधिकारमित्र’ पदाकरिता काम करण्यास इच्छुक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *