तेर ग्रामीण प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी अर्ज मागवले

Spread the love

धाराशिव -: एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प तेर अंतर्गत धाराशिव तालुक्यातील ७ रिक्त पदांसाठी (अंगणवाडी सेविका व मदतनीस) संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज https://bhartiportal.zpdharashiv.in या संकेतस्थळावर २८ नोव्हेंबर २०२५ ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत भरता येतील. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट स्वाक्षरीसह,तसेच अपलोड केलेल्या सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रांच्या प्रती ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) कार्यालय, तेर येथे जमा करणे अनिवार्य आहे.

विहित मुदतीत प्रिंट व कागदपत्रे न जमा केल्यास किंवा ऑनलाइन व प्रत्यक्ष सादर केलेल्या कागदपत्रांत तफावत असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. १) डकवाडी — अंगणवाडी सेविका, २)बावी (ढोकी) — अंगणवाडी सेविका, ३)तेर — मदतनीस, ४) रुई (ढोकी) — मदतनीस, ५) कोंड– मदतनीस, ६) जहागिरदारवाडी – मदतनीस ७) तावरजखेडा –मदतनीस येथील पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहे.

भरती प्रक्रिया महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयांनुसार केली जाईल. कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाही. १२ वी उत्तीर्ण ही किमान शैक्षणिक पात्रता; त्यापुढील शिक्षणानुसार अतिरिक्त गुण.

उमेदवार संबंधित गावची रहिवासी महिला असणे बंधनकारक आहे . तहसीलदार/सक्षम प्राधिकाऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक. वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे, तर विधवा उमेदवारांसाठी ४० वर्षे.एस सी/एस.टी उमेदवारांना ५ अतिरिक्त गुण, OBC/ NT/ VJ/ SEBC/ EWS उमेदवारांना ३ अतिरिक्त गुण;जाती प्रमाणपत्र अनिवार्य.

अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून किमान २ वर्षे अनुभव असल्यास ५ गुण (फक्त शासकीय अनुभव ग्राह्य). कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती शासन नियमांनुसार सादर कराव्यात.विवाहित उमेदवारांसाठी माहेर व सासरच्या नावासंबंधी स्वघोषणापत्र आवश्यक. खोटी माहिती सादर केल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

भरती प्रक्रिया स्थगित/बदल करण्याचा पूर्ण अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण),तेर यांना राहील.उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करून,अर्जाची प्रिंट व सर्व कागदपत्रे प्रत्यक्ष कार्यालयात जमा करावीत, अन्यथा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

  • Related Posts

    धाराशिव येथे २२ मे रोजी भव्य रोजगार मेळावा ; १७ नामांकित आस्थापनांकडून २८९ पदांसाठी भरती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व महिला उमेदवारांसाठी शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता…

    अधिकारमित्र’ पदासाठी अर्जास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Spread the love

    Spread the loveनिस्वार्थ समाजसेवेची इच्छुकांसाठी सुवर्णसंधी — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत ‘अधिकारमित्र’ पदाकरिता काम करण्यास इच्छुक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *