धाराशिव जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नवीन कार्यकारिणीची निवड – निलेश नायगांवकर सचिवपदी बिनविरोध निवड

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद धाराशिवच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते व बिनविरोध करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सचिव (सेक्रेटरी) पदावर निलेश दिनेश नायगांवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी याआधी संघटनेत उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची सचिव पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.

या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी विजय देशमुख, सचिवपदी निलेश दिनेश नायगांवकर, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब गाडे आणि उत्कर्षा काळे, कोषाध्यक्षपदी नरेंद्र झरकर व सचिन खटके तर उपाध्यक्षपदी सहदेव हब्बु आणि संतोष तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड हे नांदेड येथून विशेष उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या निवडीबद्दल संपूर्ण जिल्हा परिषद कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांकडून नव्या कार्यकारिणीचे कौतुक होत असून त्यांच्या कार्यकाळात संघटनेचे काम अधिक प्रभावी व कर्मचारी हिताचे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *