शरद पवारांचे विश्वासू अधिकारी सतीश राऊत यांचा ‘अलविदा’!

Spread the love

गेल्या १७ वर्षांपासून शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत अधिकारी राजीनामा देऊन चर्चेत

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत गेल्या १७ वर्षांपासून स्वीय सहाय्यक व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सतीश राऊत यांनी पवारांना ‘अलविदा’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

शासकीय अधिकारी असूनही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी अत्यंत आपुलकीने वर्तन करत ‘आपलेसे’ वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय झाले होते.

सतीश राऊत यांनी गेल्या दीड दशकात शरद पवार यांच्या जवळून राजकीय, सामाजिक आणि शासकीय कार्यपद्धतीचा अनुभव घेतला होता. पवार साहेबांच्या विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना केली जात असे. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि कामकाजातील तत्परतेमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.

दरम्यान, राऊत यांच्या या निर्णयामागची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, त्यांचा राजीनामा म्हणजे पवार गटासाठी मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सतीश राऊत यांच्या पुढील राजकीय किंवा प्रशासकीय वाटचालीकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा; गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

    Spread the love

    Spread the love१९७८ पासूनचा संघर्ष, संघटन आणि पक्षनिष्ठेचा इतिहास मांडत गुंड कुटुंबाची भूमिका; “निष्ठा शब्दांनी नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते” धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास…

    ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?

    Spread the love

    Spread the loveकार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *