धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षणाची सोडत जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

Spread the love

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण निश्चित

धाराशिव / मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५५ गटांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनुसार एकूण ५५ जागांपैकी ५० टक्के म्हणजेच २८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे, आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम २०२५ नुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पडली.

आरक्षणाची प्रवर्गनिहाय स्थिती:
एकूण जागा: ५५
महिलांसाठी आरक्षित: २८
  अनुसूचित जाती (SC): एकूण ९ जागा,
त्यापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव.
अनुसूचित जमाती (ST): १ जागा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): एकूण १४ जागा, त्यापैकी ७ जागा महिलांसाठी राखीव.
  सर्वसाधारण (General): एकूण ३१ जागा, त्यापैकी १६ जागा महिलांसाठी राखीव.

गटनिहाय आरक्षणाचा तपशील:

जिल्हा परिषद मुलांची शाळा, धाराशिव येथील विद्यार्थी- शाबान मोबीन सय्यद, सय्यद जैन शाहीद, आरीप वाजीद सय्यद व अब्दुल्ला नवाब शेरीकर यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.

अनुसूचित जाती (महिला): वडगाव (सि), सिंदफळ, डिकसळ, येरमाळा, व सास्तूर.

  अनुसूचित जाती (सर्वसाधारण): सिंदफळ, काक्रंबा, शहापूर, वडगाव (सि), सांजा, डिकसळ, येरमाळा, खामसवाडी व सास्तुर यापैकी महिला आरक्षण वगळून उर्वरित गट.

  अनुसूचित जमाती: ढोकी.

  नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): काटी, सुकटा, येणेगुर, वालवड, तुरोरी, मोहा आणि लोणी.

सर्वसाधारण (महिला): कोंड, जळकोट, तेर, मंगरूळ, ईट, बलसूर, कुन्हाळी, पारगाव, केशेगाव, माकणी, आनाळा, पारा, कानेगाव, अंबेजवळगा, कदेर व जेवळी.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 31 निवडणूक विभाग आरक्षित झाले आहे.त्यापैकी 16 विभाग हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. आष्टा, तेरखेडा, ईटकुर, नायगाव, पाडोळी, बेंबळी, शेळगाव,जवळा (नि), डोंजा , अणदूर, नंदगाव,कवठा,गुंजोटी, दाळींब आणि आलुर, ईट, पारगाव, पारा, कोंड, तेर, अंबेजवळगा, केशेगाव अनाळा, जळकोट, मंगरूळ, कानेगाव, माकणी, जेवळी, बलसूर व कदेर यांचा समावेश असून  सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झालेले निवडणूक विभाग कोंड ,जळकोट, तेर मंगरूळ, ईट, बलसूर, कुन्हाळी, पारगाव, केशेगाव, माकणी,अनाळा,पारा,कानेगाव,अंबेजवळगा,कदेर व जेवळी या विभागाचा समावेश आहे.

या आरक्षण सोडतीवेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *