जिल्हा नियोजन समितीची बैठक १५ ऑक्टोबरला; पालकमंत्री सरनाईक घेणार विकास कामांचा आढावा

Spread the love

धाराशिव – धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (DPC) महत्त्वपूर्ण बैठक येत्या १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणाऱ्या या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे.

बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होईल. या बैठकीच्या अजेंड्यावर अनेक महत्त्वाचे विषय आहेत. यामध्ये १ मे २०२५ रोजी झालेल्या मागील सभेच्या इतिवृत्ताला आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीला मंजुरी देणे, हा प्रमुख विषय असेल.

त्याचबरोबर, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासींसाठी उपयोजना) सन २०२५-२६ अंतर्गत सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत झालेल्या खर्चाचा सविस्तर आढावा पालकमंत्री घेणार आहेत. या प्रमुख विषयांव्यतिरिक्त, पालकमंत्र्यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या इतर महत्त्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *