धाराशिव जिल्हा संपर्कमंत्री पदी दत्तामामा भरणे यांची नियुक्ती

Spread the love

धाराशिव: राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते दत्तामामा भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी भरणे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा फायदा पक्षाला धाराशिव जिल्ह्यात होईल, अशी अपेक्षा सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • Related Posts

    निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा; गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

    Spread the love

    Spread the love१९७८ पासूनचा संघर्ष, संघटन आणि पक्षनिष्ठेचा इतिहास मांडत गुंड कुटुंबाची भूमिका; “निष्ठा शब्दांनी नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते” धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास…

    ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?

    Spread the love

    Spread the loveकार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *