उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवले; एक जण ठार, एक गंभीर तर उर्मिला देखील गंभीर जखमी

Spread the love

मुंबई – प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. उर्मिला सकाळी कामावरून घरी परत असताना हा अपघात झाला. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. या घटनेत दोन मजुरांना धडक दिली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली आहे.

मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.

ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. उर्मिलाही या अपघातात जखमी झालीये. पण एका मजूराचा यामध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे सध्या पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरु असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • Related Posts

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; 146 गुन्हे दाखल, 126 आरोपी अटकेत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *