पोलीस ठाण्याचा धडाकेबाज पराक्रम – मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी योजनेत राज्यात अव्वल

Spread the love

उमरगा – : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाण्याने मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी कार्यालयीन सुधारणा मोहिमेत संपूर्ण मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांनीही द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या दुहेरी यशामुळे धाराशिव पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.

100 दिवसांचा कठोर प्रयत्न – अनेक पातळ्यांवर सुधारणा
या मोहिमेंतर्गत कार्यालयीन कामकाज, तक्रार निवारण, स्वच्छता, कार्यालयीन सोयी, क्षेत्रभेटी, गुंतवणूक प्रोत्साहन आणि कायदेप्रसार यामध्ये उमरगा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली. डायल 112 वर आलेल्या तक्रारींवर अवघ्या 5 मिनिटांत प्रतिसाद देत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. जप्त मुद्देमालांचा निपटारा आणि “आपले सरकार” पोर्टलवरील 100% तक्रार निरसन हेही एक मोठे यश आहे.

पर्यावरणपूरक पोलीस ठाणे – निसर्गरम्य आणि सुशोभित परिसर
पोलीस ठाण्याच्या परिसरात झाडे, बाग, सेल्फी पॉइंट, पक्षांसाठी घरटी, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था, कचरा कुंड्या, वॉकींग ट्रॅक आणि व्हॉलीबॉल ग्राउंड यामुळे पोलीस ठाणे एक नवा आदर्श बनले आहे. टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेला अनुसरून अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

नागरिकांसाठी सोयी-सुविधा
अभ्यागतांसाठी वॉटर प्युरीफायर, वॉटर कुलर, प्रसाधनगृह, बाक व्यवस्था, दिशादर्शक फलक, आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्पष्ट जॉब चार्ट या सुविधा दिल्या गेल्या आहेत.

संपूर्ण टीमचा संयुक्त प्रयत्न
या यशामागे पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शन आणि सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड यांचे अविरत परिश्रम आहेत. या तीन महिन्यांच्या मोहिमेत त्यांनी अहोरात्र कार्य करून उत्कृष्ट PPT सादर करत शासनास अहवाल दिला.

उमरग्याच्या या यशाचा प्रवास निश्चितच इतर पोलीस ठाण्यांसाठी प्रेरणादायक आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *