श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन सिंहासन पुजानोंदणी करण्याचे आवाहन

Spread the love

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तिभावाने येतात.

श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जानेवारी २०२५ मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत,पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavani.org यावरून सिंहासन पुजा बुकींग या मेन्युवर क्लिक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva. org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.

सिंहासन पुजा नोंदणी २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू होईल.ती २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करता येईल.ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ डिसेंबर २०२४ रोजी १०.३० वाजता पाठविण्यात येतील.भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजतापासून ते २८ डिसेंबरपर्यंत सकाळी १० वाजतापर्यंत करावे.

सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.

भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे.प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.

भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करावे.

माहे जानेवारी -२०२५ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.

भाविकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, संस्थान तुळजापूर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *