रुपामाता अर्बन पथसंस्था ‘बँको ब्लू रिबन २०२४’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love

रुपामाता अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीने अल्पावधीत ग्राहकासोबत व्यवसायापलीकडचे नाते जपून ऋणानुबंध कायम केले असून, उत्कृष्ट व अखंड सेवा देणे, ग्राहकहित जपणे, यासाठी बँको व अवीज प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 200 ते 250 कोटी गटात उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा ‘बँको ब्लू रिबन २०२४’ पुरस्कार रूपामाता अर्बन को. ऑप.क्रेडिट सो. लि. धाराशिवला बँको सहकार परिषद ॲम्बी व्हॅली, लोणावळा येथे पुण्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान केला. हा पुरस्कार पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिवाजी बोधले, प्रशाशकीय व्यवस्थापक विशाल गुंड यांनी स्वीकारला. या वेळी अविज पब्लिकेशन चे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे, बँको चे डायरेक्टर अशोक नाईक व इतर पथसंस्थेचे सी.ई.ओ., अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

संस्थेने आपल्या सभासदांना उत्कृष्ट सेवा देण्याचा कायम प्रयत्न केला असून, हा पुरस्कार सर्वांच्या कठोर परिश्रम व कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. संस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व कर्मचारी व सदस्य सभासद परिवाराचे रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांनी अभिनंदन केले..

  • Related Posts

    भारतीय स्टेट बँक, आरबीओ धाराशिव येथे ‘अन्नदाता उत्सव’ अंतर्गत प्रगतशिल शेतकरी व कृषी उद्योजक ग्राहक मेळावा संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : भारतीय स्टेट बँक, आरबीओ धाराशिव यांच्या वतीने ‘अन्नदाता उत्सव’ उपक्रमांतर्गत आज धाराशिव येथे प्रगतशिल शेतकरी व कृषी उद्योजक ग्राहक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या…

    “तुमची ठेव,तुमचा अधिकार” – जिल्ह्यात दावा न केलेल्या ठेवींच्या वितरणासाठी मेळावा

    Spread the love

    Spread the love धाराशिव – जिल्हा अग्रणी बँक,धाराशिवने विविध बँकाच्या माध्यमातून बँकेत दावा न केलेल्या ३१ कोटी ठेवी १ लाख ३१ हजार खातेदारांना परत मिळवण्याकरता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *