आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, कॅम्पस टू कॉर्पोरेट एक दिवशीय कार्यशाळा संपन्न!

Spread the love

धाराशिव – डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस गडपाटी ,धाराशिव, येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी,मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील नवीन रोजगाराच्या व व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त डॉ.प्रतापसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवशीय कॅम्पस टू कॉर्पोरेट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व औषध निर्माण क्षेत्रातील वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी विषयी माहिती दिली. या कार्यशाळेत बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ट्रेनर श्री. संतोष सांगवे, यांनी औद्योगिक क्षेत्रातील तसेच औषध निर्माण क्षेत्रातील वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत विकासाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी काळाच्या गरजेनुसार वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व राष्ट्राचा विकास कसा साधता येईल या विषयी माहिती दिली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी बहुमोल असे उपयोगी ठरणार आहे. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील जवळपास 150 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. विक्रांत नवले व प्रा. विजय सुतार यांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *