धाराशिव शहरातील रस्त्याचे निकृष्ट बांधकाम: बीबीएमच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Spread the love

धाराशिव: शहरातील डीआयसी रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलजवळच्या रस्त्याच्या बांधकामावरून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. फीचर्स सायकलच्या समोर तेज प्रताप हॉटेलजवळ एक दिवसापूर्वीच करण्यात आलेल्या बीबीएम (ब्लॅक टॉप) रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी डांबर उखडले आहे. अवघ्या काही दिवसात रस्त्याची ही अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निकृष्ट बांधकामामुळे रहदारीला त्रास होत असून, वाहनचालकांना जीवघेणा धोका निर्माण झाला आहे.

संबंधित ठेकेदाराने कमी दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे रस्त्याची Integrity टिकली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

  • Related Posts

    श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची…

    मजुरीला गेल्याशिवाय चूल पेटणार कशी ?’… ऐंशी वर्षांच्या अनुसयाबाईंच्या शब्दांनी पालकमंत्री गहिवरले !

    Spread the love

    Spread the loveदुष्काळाच्या वेदना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट शेताच्या बांधावर ; कष्टकरी महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट ‘माझी आई आज असती, तर तीही तुमच्याच वयाची असती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *