अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुटखा माफियांवर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुटखा विक्रेते फरार

Spread the love

धाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळीसह परिसरातील अनेक गावांमध्ये गुटख्याची राजरोसपणे विक्री व पुरवठा करणारी त्रिमूर्ती अनेक वर्षापासून धुमाकूळ घालीत आहे. कर्नाटक राज्यातून उमरगा मार्गे जळकोट नळदुर्ग, येथून उंडरगाव, कनगरा बेंबळी व धाराशिव शहरातील बालाजी नगर येथील गोडाऊनपर्यंत लाखो रुपयांचा अवैध गुटखा छुप्या मार्गाने आणला जातो. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर शोध घेऊन पकडण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र ते पोलिसांना गुंगारा देत आहेत.‌ तर त्याच्या विरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळून त्यांचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी वैतागलेले नागरिक करीत आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील कनगरा येथील व हल्ली धाराशिव शहरात राहत असलेल्या प्रशांत टेळे तर बामणी येथील रोहन नानासाहेब लांडे व नांदुर्गा येथील प्रथमेश हनुमंत खटके हे दि.२९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील रुईभर पाटी येथील लोखंडी कमान जवळ महाराष्ट शासनाने विक्री व वाहतुक तसेच बाळगण्यासाठी प्रतिबंधीत केलेला व मानवी आरोग्यास हानीकारक असलेला बादशाहा गुटख्याचे १२८ पुडे अंदाजे किंमतीचे १५ हजार ३६० रूपये किंमतीचे बेंबळी पोलीसांना मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी सरकारच्यावतीने दिलेल्या तक्रारीवरून त्या त्रिमूर्तीच्या विरोधित बेंबळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. मात्र गुटखा मफियानी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाले आहेत, या त्रिमूर्ती पैकी एकालाही अद्याप पर्यंत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलेले नाही. विशेष म्हणजे ही त्रिमूर्ती बेंबळी, कनगरा, नांदुर्गा, बामणी आधी गावांसह धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुटखा पुरविण्याचे काम करीत आहे. या गुटखा माफियानी उंडरगाव, कानगरा आणि धाराशिव शहरातील बालाजी नगर परिसरात गुटखा साठवणुकीसाठी गोडाऊन देखील थाटले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.तर पुढील कारवाई बेंबळी पोलीस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *