सोलर पंप योजनेच्या आढावा बैठकीस शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे – आमदार कैलास पाटील यांचे आवाहन

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यातील वितरण क्षेत्र (आर. डी. एस. एस.), मागेल त्याला सोलार, पी. एम. कुसुम सोलार या तीनही योजनेच्या चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी एक वाजता ही बैठक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. या बैठकीला संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत त्यामुळे ज्याना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांनी योजनेसाठी अर्ज केला आहे किंवा ज्याना या योजनेत प्रशासकीय अडचणी जाणवत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी या बैठकीस हजर रहावे असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित केली असून सोमवारी दुपारी एक वाजता ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी मोठया संख्येनं हजर राहून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात असेही आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.

  • Related Posts

    कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत…

    तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveआधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *