बार्शीत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Spread the love

बार्शी : बार्शीतील पंकज नगर भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध बार्शी पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. या नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बार्शी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथक आणि सोलापूर ग्रामीण शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.

पकडलेल्या नागरिकांमध्ये 2 पुरुष आणि 4 महिला आहेत. त्यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजिर करत आहेत.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *