14 ते 20 नोव्हेंबर बालकामगार प्रथेविराधी सप्ताहाचे आयोजन

Spread the love

धाराशिव – 14 नोव्हेंबर “बालदिन” या दिवसाचे औचित्य साधून दि. 14 ते 20 नोव्हेंबर बालकामगार प्रथेविराधी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने जिल्ह्यात जिल्हा कार्यक्षेत्रातील बाल कामगार बहूलक्षेत्र निश्चित करणे, विटभट्टी येथे भेटी देवून तपासणी करणे आणि मालकांकडून/चालकाकडून बालकामगार न ठेवणेबाबतचे हमीपत्र लिहून घेणे, हॉटेल असोसिएशन यांच्या बैठका घेऊन त्यांना सुधारीत बालकामगार अधिनियमाबाबत माहिती देणे, व्यवसायातील व्यापारी संघटनाचे एकत्रित चर्चासत्र घेणे, बाल कामगार प्रथेविरुद्ध बाजारपेठ क्षेत्रात रॅली घेणे, सार्वजनिक ठिकाणी बालकामगार अधिनियमाबाबत जनजागृती करणे, जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना येथे बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत स्टीकर/पॉम्प्लेट तयार करुन प्रदर्शित करणे, औद्यागिक क्षेत्रातील सर्व मालक संघटनांची बैठक घेऊन तेथे बाल कामगार प्रथेविरुद्ध चर्चा करुन जनजागृती करणे व त्यांना बालकामगार कामावर ठेवू नये म्हणून सामुदायिक शपथ कार्यक्रम आयोजित करणे, बालकामगारांशी निगडित काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यअल्प उत्पन्न असलेल्या क्षेत्रामध्ये पालकांचे प्रबोधन करणे, पत्रके वाटणे, वस्तीमधील लोकांना बालकामगार निर्मुलन कार्यक्रमात सामावून घेणे, शासकिय कार्यालयातील अधिकाऱ्यांना घरेलू कामगार म्हणून बाल कामगारांना न ठेवण्याबाबत आवाहन करणे, प्रत्येक जिल्हा कार्यालयाने त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी/अधिकाऱ्यांना बाल कामगार प्रथेविरुद्ध संवेदनशिल करण्याकरीता कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादी.
तसेच बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय , प्रकियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्षे पूर्ण न झालेले किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालकाने,नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर, ठेवल्यास, त्यांस 6 महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा रु. 20 हजार रुपये ते रु 50 पन्नास हजार रुपये पर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवु नये असे गोविंद गावंडे, सरकारी कामगार अधिकारी, धाराशिव यांनी आवाहन केले.

  • Related Posts

    धाराशिव नगरपरिषदेला तीन नवीन अग्निशमन वाहने मिळणार; ४ कोटी ५० लाखांच्या खरेदीस शासनाची विशेष मान्यता

    Spread the love

    Spread the loveखासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती चार वाहनांची मागणी धाराशिव – : धाराशिव शहरासह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य…

    धाराशिव नगर परिषदेला तीन अद्ययावत अग्निशमन वाहने खरेदीस साडे चार कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर.

    Spread the love

    Spread the loveपालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाकडून मिळवून दिली तातडीने मंजुरी. मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत धाराशिव नगर परिषदेस तीन अद्ययावत अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठी सुमारे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *