श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!

Spread the love

‘Excellence in Business Growth’ पुरस्काराने सन्मानित; धाराशिवच्या सहकार क्षेत्राचा मान उंचावला.

धाराशिव : धाराशिव येथील श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि सातत्यपूर्ण व्यवसाय वृद्धीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘Excellence in Business Growth’ पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे आज, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित Indian Cooperative Summit & Excellence Awards 2026 या राष्ट्रीय सोहळ्यात संस्थेला हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला.

या गौरवशाली सोहळ्यात संस्थेच्या वतीने मुख्याधिकारी श्री. राजेश जाधव आणि सहमुख्याधिकारी श्री. अरविंद गोरे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री. सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष श्री. विद्याधर अनासकर तसेच केंद्रीय सहकार विभागातील मान्यवर उपस्थित होते.

संस्थेने सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार, आर्थिक शिस्त, उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि प्रभावी व्यवस्थापन यांच्या बळावर सातत्याने प्रगती साधली आहे. संस्थेच्या व्यवसाय वृद्धीची आणि सहकार क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे हा संस्थेसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त करत संस्थेशी जोडलेल्या सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा पुरस्कार संस्थेवर सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाचा आणि एकत्रित प्रयत्नांचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान संस्थेच्या प्रगतीला नवी प्रेरणा देणारा असून, भविष्यातही सहकाराच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी, विश्वासार्ह सेवा आणि समाजाभिमुख कार्य करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचा लौकिक देशभरात उंचावला असून, संस्थेच्या यशस्वी वाटचालीत आजचा दिवस एक मानाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

विश्वास, सेवा आणि समृद्धीच्या दिशेने श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटची यशस्वी वाटचाल सुरूच…

  • Related Posts

    धाराशिव नगरपरिषदेला तीन नवीन अग्निशमन वाहने मिळणार; ४ कोटी ५० लाखांच्या खरेदीस शासनाची विशेष मान्यता

    Spread the love

    Spread the loveखासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती चार वाहनांची मागणी धाराशिव – : धाराशिव शहरासह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य…

    धाराशिव नगर परिषदेला तीन अद्ययावत अग्निशमन वाहने खरेदीस साडे चार कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर.

    Spread the love

    Spread the loveपालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाकडून मिळवून दिली तातडीने मंजुरी. मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत धाराशिव नगर परिषदेस तीन अद्ययावत अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठी सुमारे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *