वाशी नगरपंचायतीला अग्निशामक केंद्रासह अग्निशमन वाहन मिळण्याचा मार्ग मोकळा :- प्रताप सरनाईक

Spread the love

महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत शासनाची प्रशासकीय मान्यता; नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय

धाराशिव – : धाराशिव जिल्ह्यातील वाशी नगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेला आता बळकटी मिळणार असून, शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले अग्निशामक वाहन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून वाशी नगरपंचायतीला महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत एक अग्निशमन केंद्र बांधकाम आणि एक अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

आगीच्या दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य आपत्कालीन प्रसंगांमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी सक्षम अग्निशमन यंत्रणा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वाशी नगरपंचायतीकडे स्वतंत्र अग्निशमन केंद्र आणि पुरेसे अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. ही गरज लक्षात घेऊन पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विषयाला सकारात्मक सहकार्य केल्याने अखेर या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाली.

शासन निर्णयानुसार वाशी नगरपंचायतीला एक अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आणि एक अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांसाठी शासन आणि नगरपंचायतीच्या सहभागातून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायतीचा १० टक्के आर्थिक हिस्सा भरण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, मंजूर अटी व शर्तींनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

या निर्णयामुळे वाशी शहरासह परिसरातील नागरिकांना आग किंवा अन्य आपत्कालीन दुर्घटनांच्या वेळी तातडीने मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणेचे बळकटीकरण होणे ही काळाची गरज होती. शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
विकासकामांच्या घोषणांपुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या मूलभूत सुरक्षिततेशी निगडित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश वाशीकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे आणि शासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे वाशी नगरपंचायतीच्या अग्निशमन सेवेला आता नवी ताकद मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

  • Related Posts

    शॉर्टसर्किटचा कहर! अणदूरमध्ये सात एकर ऊस जळून खाक; तीन शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी!

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर / अणदूर  आधीच भीषण दुष्काळाचे संकट, त्यात हातातोंडाशी आलेल्या उसाच्या पिकावर आगीचा घाला! तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचा तब्बल सात एकर ऊस जळून…

    शिक्षण सेवकांच्या मानधनात दुप्पट वाढ करा; आ. डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य तथा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *