शिक्षण सेवकांच्या मानधनात दुप्पट वाढ करा; आ. डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य तथा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील शिक्षण सेवक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अध्यापनाची जबाबदारी पार पाडताना त्यांना वाढती महागाई, निवास, प्रवास, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण तसेच आरोग्यावरील वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या मानधनात दैनंदिन गरजा भागविणेही कठीण होत असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून मानधनवाढ करणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्राथमिक स्तरावरील शिक्षण सेवकांचे सध्याचे १६ हजार रुपये मासिक मानधन वाढवून ३२ हजार रुपये, माध्यमिक स्तरावरील शिक्षण सेवकांचे १८ हजारांवरून ३६ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक स्तरावरील आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षण सेवकांचे २० हजारांवरून ४० हजार रुपये करण्यात यावे, अशी ठोस मागणी त्यांनी केली आहे.

या मागणीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करून आवश्यक वित्तीय मान्यतेसाठी सादर करावा. वित्तीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर सुधारित मानधन लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील सध्या कार्यरत असलेल्या सर्व पात्र शिक्षण सेवकांना या मानधनवाढीचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा, अशी विनंतीही आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षण सेवकांना सन्मानजनक मानधन मिळणे आवश्यक असून, त्यांच्या आर्थिक व कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    शॉर्टसर्किटचा कहर! अणदूरमध्ये सात एकर ऊस जळून खाक; तीन शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी!

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर / अणदूर  आधीच भीषण दुष्काळाचे संकट, त्यात हातातोंडाशी आलेल्या उसाच्या पिकावर आगीचा घाला! तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचा तब्बल सात एकर ऊस जळून…

    वाशी नगरपंचायतीला अग्निशामक केंद्रासह अग्निशमन वाहन मिळण्याचा मार्ग मोकळा :- प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत शासनाची प्रशासकीय मान्यता; नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय धाराशिव – : धाराशिव जिल्ह्यातील वाशी नगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेला आता बळकटी मिळणार असून, शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *