
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न प्रतिष्ठानचे सचिव श्री. दत्तात्रय (अप्पूराजे) भोसले यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी, सुरतगाव, गगेवाडी व होनसळ या गावातील सर्व शिवभक्तांच्या वतीने रायगडावरील राहणाऱ्या सर्व रहिवाशांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले.
“पहिला दिवा माझ्या महाराज्यांच्या साठी”या भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दिवाळीच्या फराळाच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. फराळ मिळाल्याने लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी असे सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षीही दिवाळीनिमित्त केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी श्री. दत्तात्रय (अप्पूराजे) भोसले, विनोद पवार, मेघराज जाधव, ज्ञानेश्वर जाधव, तुकाराम गायकवाड, कृष्णा करंडे, मारुती गुंड, हरी पाटील, किरण भोसले, युवराज भोसले, दयानंद दत्ता पवार यांच्यासह तामलवाडी, सुरतगाव, गगेवाडी, होनसळ येथील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड हे आमचे श्रद्धास्थान आहे. पहिला दिवा माझ्या महाराज्यांच्या साठी, हीच भावना घेऊन आम्ही इथे आलो आहोत. इथे राहणाऱ्या रहिवाशांची दिवाळी आनंदात जावी, हाच आमचा उद्देश आहे. यापुढेही असे सामाजिक उपक्रम सुरूच राहतील,” असे प्रतिपादन यावेळी श्री. दत्तात्रय (अप्पूराजे) भोसले यांनी केला