
सोलापूर – गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व मूलभूत प्रश्नावर व्यापक स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पाठपुरावा करत असून पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती ना पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन गौरव केला जातोय
पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार धाराशिव येथील युवा पत्रकार सलीम पठाण यांना जाहीर केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख यांनी दिली आहे
सलीम पठाण यांचा अल्प परिचय
सलीम गफ्फार पठाण हे गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते ‘उस्मानाबाद न्यूज’ वेब पोर्टलचे संपादक ‘साप्ताहिक अंतरसंवाद न्यूज चे संपादक तसेच दैनिक उस्मानाबादची बातमी’ चे संपादक म्हणून कार्यरत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी व जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने वृत्तांकन करतात. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए. (Mass Communication & Journalism) पदवी द्वितीय श्रेणीत पूर्ण केली आहे.
सलीम पठाण हे धाराशिव जिल्ह्यातील युवा पत्रकार असून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत तसेच पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी देखील त्यांचे योगदान बहुमूल्य आहे त्यांच्या कार्याची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेतली असून त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला आहे
राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने सलीम पठाण यांचे धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.