एसटीला अचानक भेट – चालक-वाहकांना सज्जड दम
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी जात असताना तुळजापूर मार्गावर पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी अचानक एसटी बस थांबवून पाहणी केली. यावेळी एसटी महामंडळाच्या अधिकृत उपाहारगृहावर बस न थांबविता अन्य ठिकाणी थांबविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सरनाईक यांनी तत्काळ बसमधील चालक आणि वाहकाशी संवाद साधत प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबाबत माहिती घेतली. बसमध्ये स्वच्छता ठेवावी असे म्हणत त्यांनी बसमध्ये जात पाहनी केली व प्रवाशी सोबत संवाद साधला.

एसटीच्या प्रवाशांना नियमानुसार सुविधा मिळणे आवश्यक असून, त्यांच्या गैरसोयीचे कोणतेही कारण खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.‘प्रवाशांना नाहक त्रास होईल किंवा त्यांची लूट होईल, असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत,’ असा सज्जड दम सरनाईक यांनी चालक-वाहकांना दिला. प्रवाशांशी सौजन्याने वागावे, एसटी महामंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि अधिकृत सुविधांचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.