Spread the love

धाराशिव : यशराज पब्लिक स्कूल, धाराशिव येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या रेखा जेवळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण अधिकारी श्री. पारवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव सुरक्षा समितीचे सदस्य गणेश रानबा वाघमारे,उमाकांत जेवळीकर नगरसेविका पारवे, नगरसेविका दिपाली पाटील,परिमल फाऊंडेशनच्या मॅनेजर मंजोरी गायकवाड उपस्थित होते,यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढून स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी, यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रम व स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी हॉलीबॉल, लेझीम, वक्तृत्व तसेच विविध शारीरिक कसरतींचे आकर्षक प्रदर्शन सादर केले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी शिक्षकवृंद पल्लवी सूर्यवंशी,मेघा मेटकरी,प्रणिता गरड,अदिती जोशी,सुषमा राऊत, मोनिका माने,उज्वला टाकळे, शअमृता ढेकणे,रवीना मॅडम,ओंकार जळते,ओम जयवंत,बालाजी गरड व मधुकर कांबळे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक,बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शाळेच्या वतीने विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सुत्रसंचलन आदिती जोशी व आभार प्राचार्या रेखाताई जेवळीकर यांनी मानले.