आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; 146 गुन्हे दाखल, 126 आरोपी अटकेत

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. दिनांक 18 मे ते 4 जून 2026 या कालावधीत विभागाने 146 गुन्हे नोंदवून 126 आरोपींना अटक केली असून 4 वाहने जप्त केली आहेत.मा. आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.या कारवाईत 388.6 बल्क लिटर देशी दारू, 82.44 बल्क लिटर विदेशी दारू, 54 बल्क लिटर बिअर, 5,150 लिटर अवैध हातभट्टी दारू, 40,260 लिटर रसायन आणि 548 लिटर ताडी जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत सुमारे 27.53 लाख रुपये आहे.यामध्ये हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व

वाहतुकीसंदर्भात सर्वाधिक 120 गुन्हे नोंदविण्यात आले असून 101 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच हॉटेल व ढाब्यांवर 10, परराज्यातील मद्यप्रकरणी 5 आणि अवैध ताडी विक्रीबाबत 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात (फुगेवाडी, हडपसर, दापोडी) विषारी दारूमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूंच्या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक सतर्क झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी 28 मेपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या विशेष मोहिमेदरम्यान 28 मे ते 4 जून 2026 या कालावधीत 83 गुन्हे दाखल करून 70 आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी 2 वाहने जप्त करण्यात आली असून 309.18 बल्क लिटर देशी दारू,

60.48 बल्क लिटर विदेशी दारू, 54 बल्क लिटर परराज्यातील मद्य, 3,765 लिटर हातभट्टी दारू, 29,500 लिटर रसायन आणि 100 लिटर ताडी जप्त करण्यात आली. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत सुमारे 17.65 लाख रुपये असल्याचे विभागाने सांगितले.सोलापूर व लातूर जिल्ह्यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाया राबवून अवैध मद्यनिर्मिती व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे विभागाने सांगितले.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *