छत्रपती संभाजी नगर सोलापूर हायवेवरील चोऱ्या कमी व्हायचं नाव घेईना!हायवेवरून चालत्या ट्रकमधुन चोरलेल्या २ लाख ९ हजार रू. किंमतीच्या मेंढया २४ तासात जप्त

Spread the love

विश्व प्रशांत न्यूज/धाराशिव :- पोलीस ठाणे येरमाळा हददीत पहाटे हायवेवरून जाणारे चालते ट्रकमधुन अज्ञात चोरट्यांनी मेंढया काढुन चोरून घेवुन गेले बाबतची घटना घडली होती त्याअनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, यांचे मार्गदर्शनाखाली व मा.पोनि श्री. विनोद इज्जपवार, स्थागुशा धाराशिव यांचे ओदशाने सदर घटनेची माहिती घेवुन गुन्हयातील गेला मुददेमाल व अज्ञात आरोपी शोध घेणेकामी स्थागुशाचे पथक, आरसीपी पथक क्र.। व क्युआरटी पथक असे रवाना होवुन पोलीस ठाणे येरमाळा येथील हायवेवरील ब्रीज येथे गेले असता पथकास गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तेरखेडा लक्ष्मी पारधी पिढी येथील व उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी यांनी पहाटे लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा जवळ हायवेवरून जाणारे चालत्या ट्रकमधुन मेंढया काढुन चोरून आणल्या असुन त्या उमरा पिढी चे बाजुला बाभळीचे झाडाखाली एक लाल रंगाचे टमटम टमटममध्ये मेंढया आहेत अशी माहिती मिळाली तेंव्हा पथकाने पोस्टे येरमाळा येथील सपोनि श्री. भालेराव साहेब यांना सदरची घटना सांगीतली लागलीच सपोनि श्री. भालेराव साहेब, पोकों/1594 तिघाडे पोकॉ/663 चौघुले असे आलेनंतर सर्व पोलीस स्टाफ माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता तेथे नमुद माहितीप्रमाणे एका बाभळीचे झाडाखाली एक लाल रंगाचे टमटम दिसले व बाजुला 7 ते 8 इसम बसलेले दिसले. पोलीस पथकास पाहुन ते इसम उठुन पळुन गेले त्यांचा पथकाने पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाहीत. पोलीस पथकाने तेथे जावुन टमटममध्ये पाहिले असता टमटममध्ये मेंढया दिसुन आल्या. गुन्हयातील नमुद फिर्यादीस फोन करून मेंढयाचे वर्णन सांगीतले असता त्या मेंढया फिर्यादीचे ट्रकमधील चोरी गेलेल्या असल्याचे सांगीतले. त्यावरून ते टमटम मेंढयासह पोलीस ठाणे येरमाळा येथे आणुन मेंढया व टमटम असा एकुण 3,19,000/- रू.चा मुददेमाल पुढील कायदेशीर कार्यवाही करिता पोस्टे येरमाळा येथे हजर केले आहे.
    सदरची कामागिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, सपोनि श्री. तात्याराव भालेराव पोस्टे येरमाळा, पोलीस हवालदार/विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोह शोभा बांगर, पोस्टे येरमाळा पोना/संतोष तिघाडे, संदीप चौघुले, रोहीत दंडनाईक, RCP पथक क्र.१ व QRT यांचे पथकाने केली आहे.

  • Related Posts

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; 146 गुन्हे दाखल, 126 आरोपी अटकेत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *