राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस स्थानकासह सर्व पोलीस स्थानकातील कार्यालयांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश

Spread the love

राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस स्थानकासह सर्व पोलीस स्थानकातील कार्यालयांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिले आहेत.

राज्य बाल हक्क आयोगाची नव्याने समिती स्थापित करण्यात आली असून, राज्यातील बालकांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

हा कक्ष बालस्नेही स्वरूपाचा असावा, जेणेकरून बालकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि अनुकूल वातावरणात संवाद साधता येईल. हा कक्ष कार्यालय परिसरात सहज दिसेल अशा ठिकाणी उभारण्यात यावा व माहिती देणारे स्वतंत्र फलक लावण्यात यावे. सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तेथे विशेष बाल पोलीस पथक कार्यरत ठेवण्यात यावे. प्रत्येक पोलीस ठाण्यात नियुक्त बाल कल्याण पोलीस अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक स्पष्टपणे दर्शविणे बंधनकारक आहे – संजय पुराणिक

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *