जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख कार्यकारणी ‘बरखास्त’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश, सोलापूर नंतर धाराशिवच काय ?

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असुन सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघात हा निर्णय घेण्यात आला असुन धाराशिव जिल्ह्याबाबत काय? याची उत्सुकता कार्यकर्त्यात लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेल्यानंतर पहिल्यांदाच शाखा ते जिल्हाप्रमुख कार्यकारणी बरखास्त केली असल्याने आता ते ऍक्शन मोडवर आले आहेत. सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे द्या, 4-5 आमदार येतील असे वक्तव्य शहाजी बापु पाटील यांनी केले होते, त्यामुळे अनेक घडामोडी घडणार आहेत.

शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यात जवळपास 50 शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांना स्थानबद्ध करीत नजरकैदेत ठेवण्यात आले होते त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते, त्यांनी सोलापूर येथे बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे व्यथा मांडली होती, त्यानंतर त्यांनी बदलाचे संकेत दिले आहेत.

बरखास्त अश्या सुचक पोस्ट करण्यात आल्या मात्र सोलापूर व माढा येथे कार्यकारिणी बरखास्त झाली, धाराशिवचं काय याची चर्चा आता यानिमित्ताने रंगली आहे. धाराशिव शिवसेनेत गटबाजी वाढली असुन आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे शिंदे यावर कोणता तोडगा काढणार याकडे लक्ष लागले आहे. अनेक जणांनी भाजपशी घरोबा केला असुन त्यांच्या आदेशाने शिवसेनेचा कारभार चालवला जात असल्याचा आरोप शिवसैनिक करीत आहेत.

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना (जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख ) कार्यकरणी बरखास्त करण्यात येत आहे.

लवकरच सर्व विभागीय संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना पदाधिकारी नेमणुका हे संपर्कप्रमुखाचा अहवाल आल्यानंतर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात येतील, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

  • Related Posts

    निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा; गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

    Spread the love

    Spread the love१९७८ पासूनचा संघर्ष, संघटन आणि पक्षनिष्ठेचा इतिहास मांडत गुंड कुटुंबाची भूमिका; “निष्ठा शब्दांनी नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते” धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास…

    ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?

    Spread the love

    Spread the loveकार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *