उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेविमानतळावर आगमन व स्वागत

Spread the love

धाराशिव – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज धाराशिव विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाले.आगमन प्रसंगी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांनी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी तर जिल्हा मराठी पत्रकार

संघाच्या वतीने सरचिटणीस संतोष जाधव व कोषाध्यक्ष संतोष हंबीरे यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे स्वागत केले. स्वागतानंतर उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी धाराशिव येथे आयोजित दैनिक पुण्यनगरी व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण केले.


  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *