आपले सरकार सेवा केंद्रांवर आता क्युआर कोडद्वारे अभिप्राय

Spread the love

सेवा अधिक पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याचा उपक्रम

धाराशिव – नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक पारदर्शक,जलद व नागरिकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांवर अभिप्राय (Feedback) नोंदविण्यासाठी क्युआर कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे.यानुसार प्रत्येक सेवा केंद्राच्या दर्शनी भागात हा क्युआर कोड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या क्युआर कोडच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्रांना एकूण ५ गुणांकन (रेटिंग) प्रणाली देण्यात आली आहे.नागरिकांनी क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित सेवा केंद्राविषयी आपला अभिप्राय, सूचना अथवा तक्रार थेट ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणार आहे.या प्रणालीमुळे सेवा केंद्रांमधील कामकाजाची गुणवत्ता तपासणे तसेच नागरिकांच्या समाधानाचा आढावा घेणे अधिक सुलभ होणार आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी संबंधित अभिप्राय क्युआर कोड केंद्राच्या दर्शनी भागात नागरिकांना स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे.तसेच सेवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना क्युआर कोड स्कॅन करून अभिप्राय देण्याबाबत प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून,आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.तसेच नागरिकांनी संबंधित क्युआर कोड स्कॅन करून सेवा केंद्रांबाबत आपला अभिप्राय नोंदवावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *