मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी प्रशासन सज्ज

Spread the love

३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विरुद्ध कारवाईचे आदेश

धाराशिव – भारत निवडणुक आयोग,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR) सुरू करण्यात आला आहे.पुढील टप्प्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार असल्याने त्याबाबतची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली ११ मार्च २०२६ रोजी झाली.

या बैठकीस जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधी,मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच नायब तहसीलदार (निवडणूक) उपस्थित होते.बैठकीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत उपस्थितांना संक्षिप्त माहिती देण्यात आली.

यावेळी मतदान केंद्रनिहाय Booth Level Agent (BLA) यांची नियुक्ती करून मतदार यादीची पडताळणी करण्यासाठी Booth Level Officer (BLO) यांच्याशी समन्वय साधावा,तसेच SIR कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी SIR अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.सन २००२ मधील मतदार यादीतील मतदारांची सन २०२४ च्या मतदार याद्यांशी पडताळणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली.मात्र,जिल्ह्यातील एकूण ३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी अद्याप SIR संदर्भातील कामकाज सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर संबंधित ३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मतदार नोंदणी अधिकारी तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान,मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सन २०२४ मधील मतदारांची सन २००२ मधील मतदारांशी पडताळणी करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

  • Related Posts

    राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस स्थानकासह सर्व पोलीस स्थानकातील कार्यालयांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश

    Spread the love

    Spread the loveराज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस स्थानकासह सर्व पोलीस स्थानकातील कार्यालयांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी…

    विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय हालचालींना वेग; धाराशिवच्या भाजप नेत्यांची महसूल मंत्र्यांशी महत्वपूर्ण भेट

    Spread the love

    Spread the love​मुंबई: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असून, या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची मंत्रालय येथे धाराशिव जिल्ह्यातील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *