पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Spread the love

महापुरुषांचे पुतळे उभारणीबाबत बैठक

धाराशिव – जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सादर करावा.काही ठिकाणी युवावर्ग अतिउत्साहात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी पुतळे उभारतात.हे अत्यंत चुकीचे आहे.थोर पुरुषांचे पुतळे उभारताना राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

आज ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतच्या बैठकीत श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार,नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त श्री.त्र्यंबक ढेंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.पूजार म्हणाले की,पुतळा उभारण्यास अधिकृत परवानगी असली तरच संबंधित पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी शासनाकडून निधी मिळू शकतो.चुकीच्या पद्धतीने पुतळे उभारल्यास कायमचे नुकसान आहे.ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणी तो उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारणार्‍या युवा वर्गावर एकदा एफआयआर दाखल झाला तर युवा वर्गाचे भविष्य कायमचे खराब होते.त्यामुळे पुतळा उभारताना आवश्यक त्या परवानग्या घेऊनच पुतळा उभारावा असे श्री.पुजार यावेळी म्हणाले.

डॉ.श्री.घोष म्हणाले,आपण जो पुतळा उभारणार आहोत त्याच्या सर्व परवान्या घेणे आवश्यक आहे.केवळ परवानगी घेऊनच पुतळा उभारून चालणार नाही तर त्याची देखभाल करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.पुतळा उभारणार्‍या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊनच पुतळा तयार करावा.मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी. पुतळा उभारण्याचे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर पुतळा उभारण्याबाबत परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे डॉ.श्री.घोष यावेळी म्हणाले.

श्रीमती.खोखर म्हणाल्या की,ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे,तो रीतसर पद्धतीने बसवावा.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *