रस्ता सुरक्षा अभियान २०२६,धाराशिव येथे चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर

Spread the love

धाराशिव – : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे मे/अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वाहन चालकांसाठी तसेच विविध कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हर्षल डाके यांनी उपस्थित उमेदवार व नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की,केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते.या अभियानांतर्गत अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते.सर्व संघटनांनी व वाहन चालकांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या शिबिरामध्ये मे/अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय,धाराशिव येथील नेत्र सहाय्यक श्री.शिवरूद्र इसाके तसेच जिल्हा रुग्णालयातील लॅब असिस्टंट श्री.एस.बी.शिंदे यांनी एकूण ३४ वाहन चालकांची नेत्र तपासणी केली.

सदर शिबीर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.प्रशांतराव साळी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्री.स्वप्निल पालवे,श्री. संदीप शिंदे,श्री.वैभव माळी,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री.कुणाल होले,श्री.सुजित वाघमारे,कार्यालय अधीक्षक श्री.डी.के.लोंढे,श्री.नरसिंह कुलकर्णी,वरिष्ठ लिपीक श्री.ए.आर. राऊत,कनिष्ठ लिपीक श्री.बालाजी वाघमारे,श्री.रोहन साखरे,श्री.रमेश क-हाले,श्रीमती संध्या राणी गवाड तसेच शिपाई श्री.दत्तू सरपे,श्री.काळे आदी उपस्थित होते.

शिबीर कार्यक्रमामध्ये ३४ वाहन चालकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक स्वप्निल पालवे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री.कुणाल होले यांनी मानले.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *