१२ जानेवारी रोजी धाराशिव येथे एकदिवसीय कार्यशाळा

Spread the love

एमएसएमई,निर्यात व उद्योजकांसाठी एकाच व्यासपीठावर मार्गदर्शन

धाराशिव – ‘इग्नाईट कन्व्हेंशन–२०२६’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे.राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई)क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे,राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे,एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम तसेच निर्यातवृद्धीस चालना देण्याच्या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांमार्फत अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावी,या उद्देशाने संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने ‘इग्नाईट कन्व्हेंशन–२०२६’ अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा सोमवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सेंट्रल बिल्डिंगजवळ,धाराशिव येथे होणार आहे.

या कार्यशाळेसाठी सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग घटक,निर्यातदार,निर्यातक्षम उद्योजक,नवउद्योजक,औद्योगिक संस्था व संघटना,औद्योगिक समूह,औद्योगिक वसाहती,शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक,प्रक्रिया उद्योग केंद्रे,तसेच राज्य शासन व संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातविषयक कामकाज करणारे घटक, संशोधक व बँक प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यशाळेत पुणे येथील डीजीएफटीचे महासंचालक,अपेडा पुणे,एमएसएमईचे सहायक संचालक,मैत्री कक्षाचे अधिकारी,इंडियन पोस्टचे अधिकारी, अधीक्षकीय कृषी अधिकारी,एसबीआयचे निर्यात वित्तपुरवठा व्यवस्थापक आदी तज्ज्ञांकडून निर्यात,उद्योगविकास व शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेडीज क्लब, धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित…

    अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण’बार्टी’ आणि ‘एमसीईडी’चा संयुक्त उपक्रम

    Spread the love

    Spread the loveअमरावती – : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *