गणेशोत्सव 2025 : परवानगीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु – पोलिसांनी केली सूचना.

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीसाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून, मंडळांनी ही परवानगी घेण्यासाठी ठराविक पद्धत अवलंबावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार, मंडळांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे:

🔹 स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
१. www.google.com वर जाऊन Mhpolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
२. या संकेतस्थळावरून https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index.aspx हा लिंक उघडावा.
३. त्यानंतर Ganesh Festival Permission या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरायचा आहे.
४. अर्जासाठी User ID आणि Password वापरून Citizen Login करावा.
५. यापूर्वी लॉगिन नसल्यास Create Citizen Login या पर्यायाद्वारे रजिस्ट्रेशन करावे.
६. लॉगिन झाल्यानंतर Ganesh Festival Permission Application हा पर्याय निवडून सविस्तर माहिती भरावी.

🔸 अर्जामध्ये द्यावयाची माहिती

मंडळाचे नाव व पत्ता

मंडप उभारणीचे ठिकाण

जबाबदार व्यक्तीचे तपशील

मंडपाचा नकाशा

महापालिका/नगरपरिषद/ग्रामपंचायत यांची परवानगी

शासकीय व अन्य विभागांची आवश्यक परवानगी

अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांकडे तो सादर झाला म्हणून पोलीस स्टेशनमार्फत तपासणी करून मंडळास परवानगी देण्यात येईल.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *