अ‍ॅप आधारित रिक्षा-टॅक्सी व ई-बाईक सेवा आता सरकारकडून

Spread the love

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई – दि २८ जुलै राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता,परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या या ॲपला जय महाराष्ट्र,महा – राईड,महा-यात्री,महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे.अशी माहिती परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी दिली.

अर्थात,मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री.अजितदादा पवार यांच्या अंतिम मान्यतेने या शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री.सरनाईक म्हणाले की,या उपक्रमाअंतर्गत अ‍ॅप विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे.यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच अ‍ॅप तयार होणार आहे.

या माध्यमातून मराठी तरुण – तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे.बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे.अशी ग्वाही मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.ते म्हणाले की, मुंबै बँकेच्या मदतीने बेरोजगार तरुण -तरुणींना अर्थसहाय उपलब्धता होईल.तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ,भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे.त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे.

मंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲपची नियमावली अंतिम टप्यात आहे.सध्या खाजगी संस्था अनाधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. त्यासाठी त्या कंपन्या चालक व प्रवासी यांची लूट करीत आहेत. सरकारकडे यंत्रणा,तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित केल्यास त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबर चालकांना देखील होईल.या संदर्भात ५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात संबंधितांची बैठक आयोजित केली आहे.या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर या ॲप निर्मितीचे तंत्रज्ञ व शासकीय अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे या बैठकीत या शासकीय ॲपला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

ही योजना महाराष्ट्रातील लाखो तरुण- तरुणींना आत्मनिर्भर बनविणारी ठरेल.खासगी कंपन्यांनी केलेल्या मक्तेदारीला या शासकीय ॲपच्या माध्यमातून पर्याय निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.


                        प्रताप सरनाईक
                     मंत्री,परिवहन विभाग

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *