जिल्हाधिकाऱ्यांची जैविक शेतीसंसाधन केंद्र व प्रयोगशाळांना भेट

Spread the love

शेतकऱ्यांसोबत घेतला पेरणीचा अनुभव

धाराशिव – डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात जैविक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण पाहणी दौरा झाला.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.,मैनाक घोष यांनी मौजे वरुडा (ता.धाराशिव) येथील धाराशिव शिवार सारथी शेतकरी उत्पादक कंपनीच्या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र व शेतबांधावरील प्रयोगशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली.

या दौऱ्यात मौजे ढोकी (ता. धाराशिव) येथे श्री.रामभाऊ केरबा पवार यांच्या शेतावर बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.मैनाक घोष यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बीबीएफ (Broad Bed Furrow) पद्धतीने सोयाबीन पेरणी केली आणि टोकन यंत्राद्वारे लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले.

त्यानंतर शंखी गोगलगायी नियंत्रण प्रात्यक्षिक देखील राबविण्यात आले. दौऱ्याचा पुढील टप्पा मौजे तडवळा येथे पार पडला,जिथे बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (SMART) पीकलँड शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देण्यात आली.यावेळी बीजोत्पादन व क्लिनिंग-ग्रेडिंग युनिटची पाहणी करण्यात आली.या निरीक्षण दौऱ्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *