ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून कुटुंबाचा अंत — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या

Spread the love

पोलीस अधीक्षक रितू खोखर तत्काळ घटनस्थळी दाखल

धाराशिव (प्रतिनिधी) -: धाराशिव तालुक्यातील बावी या गावात एका 29 वर्षीय तरुणाने ऑनलाइन जुगारामुळे निर्माण झालेल्या कर्जबाजारीपणाच्या तणावातून स्वतःच्या पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा विष देऊन खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, समाजमन सुन्न झाले आहे.

लक्ष्मण मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. तीन वर्षांपूर्वी त्याने तेजस्विनी या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांच्या दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा होता. काही महिन्यांपासून लक्ष्मण ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमच्या आहारी गेला होता. खेळत खेळता त्याने लाखो रुपये गमावले. या आर्थिक नुकसानातून सावरण्यासाठी त्याने स्वतःची एक एकर जमीन आणि गावातील प्लॉट विकला. तरीही त्याचे कर्ज फिटले नाही. त्यामुळे तो सतत मानसिक तणावात राहत होता.

रविवारी रात्री त्याने पत्नी आणि मुलाला विष पाजून ठार मारले आणि त्यानंतर स्वतः घरात गळफास लावून जीवन संपवले. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचत दरवाजा फोडून आत शिरले असता तिघांचेही मृतदेह आढळले. पोलिसांनी तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला.

घटनेची माहिती मिळताच धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली. त्यांनी संबंधित पोलिसांना सखोल तपासाचे आदेश दिले असून, ऑनलाइन रम्मीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व मानसिक परिणामांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गावात राहणाऱ्या तरुणाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याचे अनेकांना माहित होते. तरीही स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत किंवा पोलिस बीट पातळीवर याकडे लक्ष देण्यात आले नाही. अशी शोकांतिका टाळता आली असती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ही घटना केवळ एक कौटुंबिक दुर्दैवी प्रसंग नसून, समाजातील वाढते ऑनलाइन व्यसन, कर्ज व्यवस्थापनाचे अभाव, आणि मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यांचे गंभीर लक्षण आहे. शासनाने डिजिटल गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलावी, तसेच गावपातळीवर मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
जिल्ह्यात सुरु असणाऱ्या चक्री,ऑनलाईन रम्मी, मटका या अवैध धंद्याना बंद करावे म्हणून वारंवार लोकमदतने आवाज उठवला पण गेंड्याची कातडी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नसल्यामुळेच आज बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणांला आपले कुटुंब संपवावे लागले वेळीच हे अवैध धंदे बंद झाले असते तर ही वेळ आली नसती अशी चर्चा आता जिल्हाभर होत आहे.

जिल्ह्यामध्ये नव्याने पदभार घेतलेले पोलीस अधीक्षक रितू खोखर हे रुजू झाल्यानंतर तत्काळ बंद झालेले गुटखा माफिया देखील हळूहळू आता पाय पसरताना दिसत आहेत धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, सूर्यकांत पेट्रोल पंप समोरील परिसरात सुरू असलेल्या होलसेल दुकानदारांसह शहरामध्ये दहा वीस गुटखा माफिया फेरीवाले हे धाराशिव शहरात पुन्हा आपले पाय रोवत असल्याचे दिसत असून ते पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करताना दिसत आहेत मात्र याकडे स्थानिक पोलीस प्रशासन कसलीही कारवाई करत नसल्याने आता जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर अशा अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरणार का ? असा संतप्त सवाल धाराशिव कर विचारत आहेत.

या प्रकरणात पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी तात्काळ हालचाल करून तपास सुरू केला असून, त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    हशिश ऑईल तस्करी प्रकरणात मोठे यश; धाराशिव पोलिसांनी गाठला मुख्य आरोपी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : नळदुर्ग पोलिसांनी 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किमतीच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम आणि नक्षलप्रभावित भागातून अटक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *