त्रिशताब्दी गौरव वर्षानिमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मानवंदना – भाजप युवा मोर्चा आयोजित वेशभूषा स्पर्धा

Spread the love

धाराशिव – राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सवाच्या त्रिशताब्दी गौरव वर्षानिमित्त त्यांचे कार्य व जीवनकार्य नव्या पिढीपुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजप युवा मोर्चा, धाराशिव यांच्या वतीने एक भव्य वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा येत्या २२ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता प्रतिष्ठान भवन, भाजप कार्यालय, राजे बाग, धाराशिव येथे होणार आहे. राजमातांच्या जीवनातून प्रेरणा घेत त्यांच्या वेशभूषेतून त्यांच्या योगदानाला मानवंदना देण्याचा हा अनोखा उपक्रम ठरणार आहे.

स्पर्धेत ७ ते १५ वर्षे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटांतील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार असून, दोन्ही वयोगटांतील पहिल्या ३ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे आयोजन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे तालुका अध्यक्ष अजित खापरे (8605597309), शहर अध्यक्ष प्रसाद मुंडे (9623880166) व संयोजक ओंकार देवकते (8010266575) हे स्पर्धेच्या तयारीसाठी कार्यरत आहेत.

‘इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करा आणि राजमातांच्या कार्याची प्रेरणा घ्या’, असे आवाहन आयोजकांनी सर्वांना केले आहे.

  • Related Posts

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    धाराशिव – वीररत्न शिवाजी काशीद व जिवाजी महाले प्रतिष्ठान उपळे (मा) ता.जि. धाराशिव यांच्यावतीने वीररत्न शिवाजी काशीद यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.

    Spread the love

    Spread the loveतसेच शिवा काशिद जयंती निमित्त व गयाबाई श्रीमंत पवार यांच्या स्मरणार्थ स्वधार मतिमंद मुलीचे बालग्रह येथे फळ वाटप करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *