हातलादेवी मंदिर परिसरात बांधलेल्या कठड्याची नासधूस करणार्‍या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करा

Spread the love

धाराशिव- धाराशिव शहराच्या पश्चिमेस असलेल्या हातलादेवी मंदिर परिसरात नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कठड्यांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केली आहे. त्यामुळे मंदिर परिसराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले असून भाविकांसह धाराशिवकरांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. बुधवार, दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकाविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

हातलादेवी मंदिराच्या डोंगरावर भाविकांसह पर्यटक देखील मोठ्या संख्येने दररोज येतात. स्थानिकांच्या पुढाकारातून नागरिकांना बसण्यासाठी हातलादेवी मंदिर परिसरात ठिकठिकाणी कठडे बांधण्यात आलेले आहेत. परंतु अज्ञात समाजकंटकांनी या कठड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. असे समाजविघातक कृत्य करणार्‍या समाजकंटकांचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी. तसेच अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरुन यापुढे असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *