ड्रग्स प्रकरणाची केंद्रीय नारकोटिस्ट ब्युरो कडून तपास करावा अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे ओमराजे यांची मागणी.

Spread the love

धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात “एम.डी. ड्रग्ज”ची वाहतूक आणि विक्री होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या आमली पदार्थांच्या सेवनामुळे विशेषतः तरुण वर्गाच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून, त्यांची पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
जिल्हा पोलीस प्रशासन यांनी या प्रकरणाचा तपास सुरूवातीला हेड कॉन्स्टेबल नंतर एपीआय व त्यानंतर पीआय कडे दिला असून सदरील प्रकरण गंभीर आहे त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या वर कडक कारवाई होणे आवश्यक आहे
खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या समस्येवर तातडीने आणि कठोर कारवाईची मागणी करत, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे खालील उपाययोजना सुचविल्या आहेत: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत जिल्ह्यातील ड्रग्ज सिंडिकेट पूर्णतः नष्ट करण्यासाठी CNB मार्फत सखोल चौकशी करून गुन्हेगारांचे सर्व पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सोलापूर, मुंबई आणि स्थानिक ड्रग्ज पेडलर्सच्या माध्यमातून "एम.डी. ड्रग्ज"च्या वाहतूक आणि खरेदी-विक्रीमध्ये समाविष्ट असलेल्या गुन्हेगारांवर नार्कोटिक्स विभागांतर्गत कठोर कारवाई करावी. खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित राहील.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *