मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती, धाराशिव 2025 च्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे यांची निवड.

Spread the love

धाराशिव – मागील सतरावर्षांपासून शहरात दरवर्षी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. यंदा या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे (आयुर्वेदाचार्या व पंचकर्म तज्ञ) यांची तर कार्याध्यक्षपदी विष्णु यमपुरे यांची निवड करण्यात आली.
जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी १२ जानेवारीपासून समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.
राजमाता जिजाऊ पुरस्कार, लोकराजा राजर्षी शाहु समाजभूषण पुरस्कार, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रीडाभुषण पुरस्कार, कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार. मान्यवरांची व्याख्याने, पुस्तक प्रदर्शन, स्त्री रुग्णालय येथे विविध साहित्य वाटप तसेच भव्य रक्तदान शिबीर देखील या निमित्ताने आयोजित केले जाते. यावर्षी देखील समितीच्यावतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *