महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्या कडून श्री आई तुळजाभवानी मातेची अभिषेक महापूजा

Spread the love

फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर येथे रंगलेल्या प्रतिष्ठेच्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ यांनी आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक महापूजा केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ ने ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पृथ्वीराज मोहोळ हे आज पहिल्यांदाच आपल्या कुटुंबीयासमवेत श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाला आले होते.
मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, श्रीकांत पवार, ऋषभ रेहपांडे, स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे, सुमित रघुजीवार, पवन पांडे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *