मा.ना.ॲड.आशिष शेलार यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर विकास कामांची केली पाहणी

Spread the love

तुळजापूर : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ना. ॲड. आशिष शेलार यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली व काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

यावेळी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात ॲड. आशिष शेलार यांनी श्री तुळजाभवानी मंदिराच्या नवीन विकासकामांसंदर्भात पुरातत्व विभागासोबत आढावा बैठक घेतली. यापूर्वी देखील मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या दालनात पुरातत्व विभागासोबत बैठक पार पडली होती.

‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्र’ या संस्थेचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ आणि महावस्त्र देऊन मंदिर संस्थानच्या वतीने श्री. शेलार यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमास तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सहायक संचालक जया वहाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर आणि मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *