पालकमंत्री प्रताप सरनाईक १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात , मंत्री झाल्यानंतर सोलापूर ते धाराशिव पहिल्यांदाच करणार एसटीने प्रवास

Spread the love

धाराशिव  ( प्रतिनिधी) – परिवहन मंत्री तथा प्रताप सरनाईक हे १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सायंकाळी ५ वाजता सोलापूर बस आगार येथून एसटीने धाराशिवकडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजता धाराशिव येथे आगमन व मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती. सायंकाळी ७ वाजता धाराशिव येथून मोटारीने कळंबकडे प्रयाण.सायंकाळी ७.४० वाजता कळंब येथे आगमन व कळंब येथील स्वागत समारंभास उपस्थिती. रात्री ८ वाजता कळंब येथील शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थिती.शिवसेना तालीम संघ शिवजयंती उत्सवात उपस्थिती.रात्री ८.४५ वाजता बस आगार कळंबची पाहणी करून रात्री ९ वाजता सोलापूरकडे प्रयाण व मुक्काम करतील.

२० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर येथून तुळजापूरकडे प्रयाण ८:४५ वाजता तुळजापूर येथे आगमन,सकाळी ८.४५ ते सकाळी ९.४५ वाजता दरम्यान आई तुळजाभवानी मातेचे कुटुंबासमवेत दर्शन व महापूजा.सकाळी ९.४५ ते १० वाजता आई तुळजाभवानी मंदिरामधील गाभाऱ्यातील दगडांना तडे गेल्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी व चर्चा.सकाळी १० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत श्री तुळजाभवानी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची १२४ भक्त निवासस्थान, तुळजापूर येथे पाहणी व सकाळी १०.१५ वाजता राणी लक्ष्मीबाई उद्यान सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून सकाळी १०.३० वाजता तुळजापूर येथून शासकीय मोटारीने धाराशिवकडे प्रयाण करतील. सकाळी १०.५० वाजता धाराशिव येथे आगमन व व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती.दुपारी १२.१५ वाजता नळदुर्ग येथे आगमन व नळदुर्ग किल्ल्याची पाहणी.दुपारी दुपारी १ ते दुपारी २ वाजतापर्यंत उपजिल्हा रुग्णालय,नळदुर्ग लोकार्पण सोहळा व विविध रुग्णालय ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी २ वाजता नळदुर्ग येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण करतील.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *